१ जून घटना
घटना
- २०२२: आशिया कप – भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२२ आशिया कप स्पर्धेत जपानवर 1-0 असा विजय मिळवून कांस्यपदक जिंकले.
- २०११: स्पेस शटल एंडेव्हर – ने २५ फ्लाइट्सनंतर अंतिम लँडिंग केले.
- २००९: जनरल मोटर्स – कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही चौथी मोठी दिवाळखोरी आहे.
- २००४: टेरी निकोल्स – यांना ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटाचा सह-षड्यंत्रकर्ता म्हणून जमिनीच्या शक्यतेशिवाय सलग१६१ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ह्या शिक्षेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
- २००४: रमेशचंद्र लाहोटी – यांनी भारताचे ३५वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली.
- २००३: थ्री गॉर्जेस धरण, चीन – धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
- २००१: नेपाळी राजेशाही हत्याकांड – युवराज दीपेंद्र यांनी नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची निर्घृण हत्या केली.
- १९९६: एच. डी. देवेगौडा – यांनी भारताचे ११वे पंतप्रधान सूत्रे हाती घेतली.
- १९८८: युरोपियन सेंट्रल बँक – स्थापना.
- १९८८: इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी – अंमलात आली.
- १९८०: केबल न्यूज नेटवर्क (CNN) – प्रसारण सुरु केले.
- १९६४: केनिया – देश प्रजासत्ताक बनला.
- १९६१: कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्स – कॅनेडियन बँक ऑफ कॉमर्स आणि इम्पीरियल बँक ऑफ कॅनडाचे विलीनीकरण, कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी बँक विलीनीकरण, यातून कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्सची स्थापना.
- १९६१: कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्स – स्थापना.
- १९६१: फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC), अमेरिका – या संस्थेला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
- १९५९: द. गो. कर्वे – पुणे विद्यापीठाचे ३रे कुलगुरू बनले.
- १९५०: चिंचगा आग – उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा वणवा.
- १९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) – सुरवात.
- १९४१: दुसरे महायुद्ध – क्रेतेची लढाई संपली, क्रेतेने जर्मनीसमोर शरण गेले.
- १९३०: दख्खनची राणी (Deccan Queen) – रेल्वेगाडी मुंबई व पुणे दरम्यान सुरू झाली.
- १९२९: प्रभात फिल्म कंपनी – सुरवात.
- १८९८: हॉटेल रिट्झ, पॅरिस – सुरवात.
- १८३१: सरजेम्स रॉस – यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
- १७९६: अमेरिका – टेनेसी हे १६वे राज्य बनले.
- १७९२: अमेरिका – केंटुकी हे १५वे राज्य बनले.