१ ऑक्टोबर घटना
घटना
- १७९१: फ्रांस – फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
- १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय – सुरु झाले.
- १८४७: सीमेन्स एजी – वर्नर वॉन सीमेन्स यांनी कंपनीची सुरवात केली.
- १८८७: बलुचिस्तान – देश ब्रिटिश साम्राज्याने जिंकला.
- १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका – सुरु झाले.
- १८९८: व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस एडमिनिस्ट्रेशन – स्थापना झाली.
- १९०८: फोर्ड मॉडेल टी – गाडीची US$825 च्या किमतीत विक्री सुरु झाली.
- १९१८: पहिले महायुद्ध – इजिप्शियन सैन्याने दमास्कस काबीज केले.
- १९२८: नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क – सुरु झाले.
- १९३१: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज, अमेरिका – न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा पूल नागरिकांसाठी खुला झाला.
- १९३९: दुसरे महायुद्ध – एका महिन्याच्या वेढा नंतर, जर्मन सैन्याने वॉर्सा शहर ताब्यात घेतले.
- १९४०: पेनसिल्व्हेनिया टर्नपाइक, अमेरिका – देशातील पहिला सुपरहायवे मानला जाणारा रास्ता रहदारीसाठी खुला झाला.
- १९४६: मेन्सा इंटरनॅशनल, युनायटेक किंगडम – स्थापना झाली.
- १९४९: पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना – स्थापना झाली.
- १९५३: आंध्र राज्य – तयार झाले.
- १९५८: भारत – देशात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
- १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा – यांनी भारताचे ६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९६०: नायजेरिया – देशालाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- १९६१: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका – देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना झाली,
- १९६४: जपानी शिंकनसेन (बुलेट ट्रेन) – टोकियो ते ओसाका पर्यंत हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू.
- १९६९: कॉनकॉर्ड विमान – प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.
- १९७१: सीटी स्कॅनर – रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले गेले.
- १९७१: वॉल्ट डिस्ने वर्ल्ड, फ्लोरिडा, अमेरिका – सुरु झाले.
- १९७८: तुवालू – देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९७९: MTR, हाँगकाँग – जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरु झाली.
- १९८२: सोनी – कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
- १९९२: कार्टून नेटवर्क चॅनल – सुरु झाले.
- २००१: काश्मीर आतंकी हल्ला – राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन.