१० जून घटना
घटना
- १७६८: मराठा साम्राज्य – माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाले.
- १९२४: ज्याकोमो मॅट्टेओटी – इटलीचे समाजवादी नेते, यांची हत्या.
- १९३५: अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस – स्थापना.
- १९४०: दुसरे महायुद्ध – फॅसिस्ट इटलीने फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमवर युद्ध घोषित केले.
- १९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२: दुसरे महायुद्ध – लिडिस हत्याकांड: ओबर्गरुपेनफ्युहरर रेनहार्ड हेड्रिच यांच्या हत्येचा बदला.
- १९४४: दुसरे महायुद्ध – ओराडोर-सुर-ग्लेन हत्याकांड: फ्रांस मधील ओराडोर-सुर-ग्लेन ६४२ लोकांची हत्या.
- १९४४: दुसरे महायुद्ध – डिस्टोमो हत्याकांड: ग्रीसमधील डिस्टोमो येथे जर्मन सैन्याने २१८ लोकांची हत्या केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध – ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
- १९५७: कॅनडा – जॉन डायफेनबेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह पार्टीने २२ वर्षांचे लिबरल पक्षाचे सरकार संपुष्टात आणले.
- १९६३: १९६३ चा समान वेतन कायदा, अमेरिका – लिंगावर आधारित वेतन असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला.
- १९६७: सहा दिवसांचे युद्ध – इस्रायल आणि सीरिया युद्ध संपवण्यास मंजुरी दिली.
- १९७७: अँपल इन्क – अँपल-II संगणक प्रकाशित.
- १९८०: नेल्सन मंडेला – दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचे आवाहन केले.
- १९८२: लेबनॉन युद्ध – सुलतान याकूबची लढाई: सीरियन अरब सैन्याने इस्रायली संरक्षण दलाचा पराभव केला.
- १९८२: – दृष्टी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
- १९९४: चीन – एरिया C (बेशान), लोप नूर येथे अणुचाचणी केली.
- १९९९: उस्ताद झाकीर हुसेन – यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
- २००१: संत रफ्का – पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी लेबनॉनच्या पहिल्या महिला संत, संत रफ्का यांना मान्यता दिली.
- २००२: केविन वॉर्विक – यांनी दोन मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग युनायटेड किंगडम मध्ये केला.
- २००३: मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन – नासाचे स्पिरिट रोव्हर लाँच करून मिशनची सुरवात.