११ फेब्रुवारी घटना
घटना
- १६६०: – औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
- १७५२: – पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
- १८१८: – इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
- १८२६: – लंडन विद्यापीठाची स्थापना.
- १८३०: – मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
- १९११: – हेन्ऱ्या;री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
- १९२९: – पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
- १९७९: – पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९९०: – २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
- १९९९: – मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
- २०११: – १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्
नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
- ६६०: – सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.