१२ एप्रिल घटना
- २०२४ : युरोपियन युनियन — युरोपियन युनियनने इजिप्त देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी अल्पकालीन आर्थिक मदत म्हणून €१ अब्ज युरोस देण्याचे वचन दिले.
- २००९ — झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
- १९९८ — सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- १९९७ — भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
- १९६७ — कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
- १९६१ — रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९४५ — अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्टकार्यालयात असतानाच निधन झाले.
- १६०६ — ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.