१५ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १६०८: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – हवादाबमापीचे (barometer) संशोधक
- १८८१: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक
- १८९६: सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती
- १८९७: मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर – भारतीय गायक आणि संगीतज्ञ
- १८९७: जोहान्स सिक्कर – एस्टोनिया देशाचे पंतप्रधान हद्दपार, एस्टोनियन सैनिक आणि राजकारणी
- १९०८: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
- १९२०: मारिओ पुझो – अमेरिकन लेखक
- १९२६: नारायण गंगाराम सुर्वे – कवी
- १९३१: ए. पी. जे. अब्दुल कलाम – भारताचे ११वे राष्ट्रपती – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
- १९३२: जी. एस. वरदाचारी – भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार
- १९३४: एन. रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक
- १९३४: माया थेवर – भारतीय राजकारणी, खासदार
- १९४६: व्हिक्टर बॅनर्जी – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
- १९४९: प्रणोय रॉय – पत्रकार, एन. डी. टी. व्ही.चे संस्थापक
- १९५४: मिथिलेश चतुर्वेदी – भारतीय अभिनेते
- १९५५: कुलबुर भौर – भारतीय फील्ड हॉकी खेळाडू
- १९५७: मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
- १९६९: पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक