१६ नोव्हेंबर घटना
घटना
- २०००: – कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
- १९९७: – अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
- १९९६: – कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ.
- १९८८: – अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
- १९४५: युनेस्को (UNESCO) – स्थापना.
- १९३०: – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
- १९१५: – लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
- १९१४: – अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
- १९०७: – ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
- १८६८: – लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.