१६ ऑक्टोबर घटना
घटना
- १७९३: – फ्रेन्च राज्यक्रांती फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी ऍ ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
- १८४६: – डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
- १९०५: – भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
- १९५१: – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
- १९६८: – हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
- १९७३: – हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १९७५: – बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
- १९७८: – माऊंट एव्हरेस्टच्या शीखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
- १९८४: – आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १९८६: – ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शीखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.