१७ जून घटना
- २०२२ : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट — इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
- २०२२ : चीन — फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
- १९९१ : राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- १९८५ : स्पेस शटल प्रोग्राम — STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
- १९६७ : चीन — देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
- १९६३ : अमेरिका — सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९४४ : आइसलँड — देशाने डेन्मार्कपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- १९४० : दुसरे महायुद्ध — दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
- १९४० : दुसरे महायुद्ध — आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
- १९४० : दुसरे महायुद्ध — ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.
- १८८५ — न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.
- १६३१ : मुमताज — ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.