२० ऑक्टोबर घटना
घटना
- २०११: – लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
- २००१: – रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
- १९९५: – ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
- १९९१: – उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
- १९७३: – सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
- १९७१: – मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
- १९७०: – हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
- १९६९: – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
- १९६२: – चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
- १९५२: – केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
- १९५०: – कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
- १९४७: – अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- १९०४: – चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.