२२ सप्टेंबर घटना
- १९८० : इराण-इराक युद्ध — इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरवात.
- १९६५ : दुसरे काश्मीर युद्ध — संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
- १९४१ : युक्रेन होलोकॉस्ट — जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
- १९३९ : दुसरे महायुद्ध — पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.
- १९३१ — नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
- १९१४ — जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.
- १८९१ : फिनलंड — देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला
- १८८८ : द नॅशनल जिऑग्रॉफिक — मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
- १६६० : मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
- १४९९ : स्वित्झर्लंड — बेसलचा तह: स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.