२३ मार्च घटना
घटना
- १८३९: – बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
- १८५७: – न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
- १८६८: – कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
- १९१९: – बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
- १९३१: – भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
- १९४०: – संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
- १९५३: पाकिस्तान – देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान करण्यात आले.
- १९५६: – पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
- १९८०: – ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
- १९९८: – अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- १९९९: – क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
- १९९९: – क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
- २००१: – रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.