२४ जून घटना
घटना
- १४४१: इटन कॉलेज – स्थापना.
- १७९३: फ्रान्स – पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
- १८८०: कॅनडा – ओ कॅनडाचे हे गाणे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.
- १९१६: मेरी पिकफोर्ड – १० लाख (१ मिलिअन) डॉलर्स मानधन मिळवणाऱ्या पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या.
- १९१८: कॅनडा – मॉन्ट्रियल ते टोरोंटो अशी पहिली एअरमेल सेवा सुरु.
- १९३९: थायलंड – देशाचे सयाम ते थायलंड असे नामकरण करण्यात आले.
- १९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
- १९८१: हंबर ब्रिज, इंग्लंड – देशातील यॉर्कशायर आणि लिंकनशायर शहरांना जोडणारा २.२ किमी लांबीचा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हा त्याकाळातील सर्वात लांब पूल होता.
- १९८२: – कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
- १९९६: – मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
- १९९८: चंद्रकांत मांडरे – यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
- २००१: भारतीय नौदल – आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
- २००४: अमेरिका – न्यूयॉर्कमध्ये फाशीची शिक्षा असंवैधानिक घोषित करण्यात आली.
- २०१०: सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच, विम्बल्डन – अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि फ्रान्सच्या निकोलस माहुत यांच्यातील मॅच ८ तास ११ मिनिट चालली. ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे.
- २०१०: ज्युलिया गिलार्ड – यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
- २०१०: जुलिया गिलार्ड – यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
- २०२२: गर्भपात अधिकार, अमेरिका – गर्भपात करण्याच्या अधिकारावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले.
- २०२२: गौतम अदानी – यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली