२५ नोव्हेंबर जन्म
- १९८३ : झुलन गोस्वामी — भारतीय क्रिकेटर
- १९७२ : दीपा मराठे — भारतीय क्रिकेटपटू
- १९४४ : मायकेल किजाना वामलवा — केनिया देशाचे ८वे उपाध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १९३९ : उस्ताद रईस खान — मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
- १९३५ : गोविंद सावंत — महाराष्ट्रीय हॉकीपटू
- १९२६ : रंगनाथ मिश्रा — भारताचे २१ वे सरन्यायाधीश
- १९१५ : चुंग जू-युंग — ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक
- १९१३ : बेंजामिन वॉकर — भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार
- १८९८ : देबाकी बोस — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
- १८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर — मराठी चित्रकार
- १८७९ : साधू वासवानी — आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
- १८७२ : कृष्णाजी खाडिलकर — नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक
- १८४४ : कार्ल बेंझ — मर्सिडीज-बेंझ कंपनीचे सह-संस्थापक, ऑटोमोबाईल उद्योगाचे जनक
- १८४१ : आर्न्स्ट श्रोडर — जर्मन गणितज्ञ