२५ नोव्हेंबर निधन
- २०१६ : फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ — क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान
- २०१४ : सितारा देवी — भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर
- २०१३ : लीलावती भागवत — बालसाहित्यिका
- १९९८ : पी. एन. हक्सर — प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव
- १९९७ : हेस्टिंग्ज बांदा — मलावी देशाचे पहिले अध्यक्ष
- १९८४ : यशवंतराव चव्हाण — भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
- १९७५ : रॉस मॅक्वाहिरटर — गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे सहसंस्थापक
- १९७४ : यू. थांट — संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
- १९६८ : रॅडोजे लजुटोव्हॅक — शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती
- १९६२ : दासगणू महाराज — आधुनिक संतकवी
- १९६० : अनंत सदाशिव अळतेकर — प्राच्यविद्यापंडित
- १९५५ : लुई लाचेनल — अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक
- १९२२ : पांडुरंग दामोदर गुणे — प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक
- १८८५ : अल्फान्सो (बारावा) — स्पेनचा राजा
- १६४८ : डायसन — चीन राजपुत्र आणि राजकारणी