२६ डिसेंबर घटना
घटना
- १८९५: – लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
- १८९८: – मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
- १९७५: – मॅक २ पेक्षा जोरात उडणारेजगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिकटु - १४४ विमानसेवा सुरू झाली.
- १९७६: – कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
- १९८२: – टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
- १९९१: – सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
- १९९७: – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
- २००४: – ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.