३ ऑगस्ट घटना
घटना
- १०४६: सांताक्लॉज लँड, थीम पार्क – जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.
- १७८३: माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान – या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
- १८११: जंगफ्राऊ शिखर – या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
- १८५९: अमेरिकन डेंटल असोसिएशन – ची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.
- १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी – स्थापन झाली.
- १९१४: एडॉल्फ हिटलर – यांनी बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
- १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.
- १९३६: – आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
- १९४०: दुसरे महायुद्ध – इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
- १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) – स्थापना झाली.
- १९४९: नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन – बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
- १९६०: नायजेरिया – देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९७७: TRS-८० कॉम्पुटर – टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
- १९९४: अनिल विश्वास – संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
- १९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड – या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
- २०००: शाजी एन. करुण – मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
- २००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका – ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.