३ जून घटना - दिनविशेष

  • जागतिक सायकल दिन

२०१९: खार्तूम हत्याकांड - सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला त्यात किमान १०० लोंकांचे निधन.
२०१७: लंडन ब्रिज हल्ला - इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
२०१५: घाना मधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान २०० लोकांचे निधन.
२०१३: चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
२०१२: राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
२००६: मॉन्टेनेग्रो - सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांचे एकत्रीकरण होऊन हा देश स्वत्रंत झाला.
१९९८: जर्मनी मधील हायस्पीड रेल्वेचा यांत्रिकी बिघाडामुळे अपघात त्यात १०१ लोकांचे निधन.
१९९१: माउंट अनझेन - जपानमधील क्युशू येथील ज्वालामुखीचा उद्रेक त्यात ४३ लोकांचे निधन.
१९८९: चीन - थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या आंदोलकांना घालवण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सैन्याने कारवाई सुरु केली.
१९८०: १९८० ग्रँड आयलंड चक्रीवादळ - अमेरिकेतील नेब्रास्का मध्ये झालेल्या चक्रीवादळात ५ लोकांचे निधन तर ३० करोड डॉलर्स चे नुकसान.
१९७९: इक्क्सटॉक १ - या मेक्सिकोच्या दक्षिणे आखातातील तेल विहिरीतील स्फोटामुळे किमान ३०लाख बॅरल तेल समुद्रात पसरले.
१९७३: सोव्हिएत सुपरसॉनिक तुपोलेव्ह Tu-144 - या सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा फ्रान्स मध्ये अपघात, यात १४ लोकांचे निधन. हा सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा पहिला अपघात आहे.
१९६५: जेमिनी ४ - नासाच्या जेमिनी ४ या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण. याच मोहिमेत एड व्हाईट हे स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन बनले.
१९६२: एअर फ्रान्स फ्लाइट ००७ - या विमानाचा पॅरिस, ऑर्ली विमानतळावर स्फोट त्यात १३० लोकांचे निधन.
१९५०: अन्नपूर्णा शिखर - मॉरिस हेर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी अन्नपूर्णा १ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शीखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध - अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
१९४१: दुसरे महायुद्ध - जर्मनीने ग्रीक देशातील गाव कंडानोस जमीनदोस्त केले आणितिथल्या १८० रहिवाशांची हत्या केली.
१९४०: दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने पॅरिसवर बॉम्बहल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - डंकर्कच्या लढाईत जर्मनीचा विजय, दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने माघार घेतली.
१९३५: निषेध ट्रेक, कॅनडा - एक हजार बेरोजगार कामगा मालवाहू गाड्यांवर चढले, त्यांनी ओटावा येथे निषेध ट्रेक आंदोलन सुरू केले.
१८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१८१८: मराठा साम्राज्य - मराठा साम्राज्याचा अस्त, शेवटचा पेशवा बाजीराव मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले.


सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023