८ फेब्रुवारी घटना
घटना
- २०२२: कोविड-१९ – जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
- २०२२: ऑलिंपिक – २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
- २०००: – छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
- १९९४: – भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
- १९७१: – NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
- १९६०: – पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
- १९४२: – दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
- १९३६: – १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
- १९३१: – महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
- १८९९: – रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
- १८४९: – रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
- १७१४: – छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.