८ मे घटना
घटना
- १८८६: – जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
- १८९९: – क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
- १९१२: – पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
- १९३२: – पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
- १९३३: – महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
- १९४५: – दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
- १९६२: – पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
- १९७४: – रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.