२८ मार्च
घटना
- १९९८: — सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.
- १९९२: — उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
- १९७९: — अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
- १९४२: — रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.
- १९३०: — तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
- १९१०: — हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
- १८५४: — क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
- १७३७: — बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
जन्म
- १९६८: नासिर हुसैन — इंग्लिश क्रिकेटपटू
- १९२६: पॉली उम्रीगर — भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर
- १८६८: मॅक्झिम गॉर्की — रशियन लेखक
निधन
- २०००: राम देशमुख
- १९९२: सम्राट आनंदऋषीजी — स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य
- १९६९: ड्वाईट आयसेनहॉवर — अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष
- १९४३: एस. सत्यमूर्ती — भारतीय वकील आणि राजकारणी
- १९४२: रामप्रसाद चंदा — भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार
- १९४१: कावसजी जमशेदजी पेटीगारा — भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर
- १९४१: व्हर्जिनिया वूल्फ — ब्रिटिश लेखिका
- १९३: पेर्टिनॅक्स — रोमन सम्राट
- १९१६: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई — राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते
- १५८४: इव्हान द टेरिबल — रशियन शासक
- १२३९: सम्राट गो-तोबा — जपान देशाचे सम्राट