२९ मार्च
घटना
- २०१४: — इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
- १९८२: — एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
- १९७४: मरिनर प्रोग्राम — नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
- १९७३: — व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
- १९६८: — महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
- १९३०: — प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
- १८५७: — बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
- १८४९: — ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
जन्म
- १९४८: नागनाथ कोतापल्ले — साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
- १९४३: जॉन मेजर — इंग्लंडचे पंतप्रधान
- १९३९: सुरमा भोपाली — भारतीय विनोदी अभिनेते
- १९३०: अनिरुद्ध जगन्नाथ — मॉरिशसचे पंतप्रधान
- १९२९: उत्पल दत्त — भारतीय रंगभूमी आणि चित्रपट कलाकार
- १९२६: बाळ गाडगीळ — अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
- १९१८: सॅम वॉल्टन — अमेरिकन उद्योगपती, वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक
- १९१४: चापमॅन पिंचर — भारतीय-इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक
- १८६९: सर एडविन लुटेन्स — दिल्लीचे नगररचनाकार
- १७९०: जॉन टायलर — अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष
- १००१: सोक्कते — बर्मा देशाचे मूर्तिपूजक राजवंशाचा राजा
निधन
- १९९७: पुपुल जयकर — सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
- १९८२: वॉल्टर हॉलस्टेन — युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष
- १९७१: धीरेंद्रनाथ दत्ता — बांगलादेशी राजकारणी
- १९६६: स्टायलियनोस गोनाटास — ग्रीस देशाचे १११वे पंतप्रधान, कर्नल आणि राजकारणी
- १९६४: वत्स जोशी — इतिहाससंशोधक