१ ऑगस्ट
घटना
- २०२२: मंकीपॉक्स रोगराई २०२२ — भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.
- २००८: के२ शिखर — ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
- २००८: बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे — जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
- २००१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ — स्थापना.
- १९९६: राजकुमार — कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- १९९४: भारतीय रेल्वे — प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
- १९८१: एम.टी.व्ही. (MTV) — चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
- १९८०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर — या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.
- १९६१: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका — संस्थेची सुरवात.
- १९६०: पाकिस्तान — इस्लामाबाद शहर राजधानी बनले.
- १९६०: बेनिन — देशाने फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
- १९५७: नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) — अमेरिका आणि कॅनडा देशांनी स्थापना केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध — वॉर्सॉ, पोलंड देशात नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
- १९४३: दुसरे महायुद्ध — ब्लॅक संडे: ऑपरेशन टायडल वेव्ह: अमेरिकन सैन्याचा रोमानिया देशातील तेलसाठे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न.
- १९३६: ऑलिम्पिक — बर्लिन, जर्मनी मध्ये १९३६च्या ऑलिम्पिक स्पर्धाना सुरवात.
- १९१४: पहिले महायुद्ध — जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले, इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरवात.
- १९११: हॅरिएट क्विंबी — एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला बनल्या.
- १८९४: पहिले चीन-जपानी युद्ध — सुरू.
- १८७६: अमेरिका — कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
- १८५५: मॉन्टे रोझा — या आल्प्स पर्वत रांगेतील दुसरे सर्वोच्च शिखरावर पहिली यशस्वी चढाई.
- १८३४: ब्रिटिश साम्राज्य — गुलामगिरी निर्मूलन कायदा १८३३ नुसार ब्रिटिश साम्राज्यात (ईस्ट इंडिया कंपनी वगळून) गुलामगिरी संपुष्टात आली.
- १८००: युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड — ग्रेट ब्रिटनआणि आयर्लंडचे राज्य विलीन करून स्थापन झाले.
- १७७४: ऑक्सिजन — जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
- १४९८: ख्रिस्तोफर कोलंबस — व्हेनेझुएला देशाला भेट देणारे पहिले युरोपियन बनले.
जन्म
- ९९२: Goryeo च्या Hyeonjong — कोरियन राजा
- १९९२: मृणाल ठाकूर — भारतीय अभिनेत्री
- १९८७: तापसी पन्नू — भारतीय अभिनेत्री
- १९६९: ग्रॅहॅम थॉर्प — इंग्लिश क्रिकेटपटू
- १९५७: रामवीर उपाध्याय — भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
- १९५५: अरुण लाल — भारतीय क्रिकेटपटू, समालोचक
- १९५२: यजुर्वेंद्र सिंग — भारतीय क्रिकेटपटू
- १९५२: झोरान दिंडीक — सर्बिया देशाचे ६वे पंतप्रधान, तत्त्वज्ञ आणि राजकारणी
- १९४९: कुर्मनबेक बकीयेव — किरगिझस्तान देशाचे २रे अध्यक्ष आणि राजकारणी
- १९४८: एव्ही अराद — मार्वल स्टुडिओचे संस्थापक
- १९४८: अवी अराड — इस्त्रायली-अमेरिकन पटकथा लेखक आणि निर्माते, मार्वल स्टुडिओचे संस्थापक
- १९४५: डग्लस ओशेरॉफ — अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९४०: हेन्री सिल्व्हरमन — अमेरिकन उद्योगपती, सेंडंटचे संस्थापक
- १९३६: यवेस सेंट लॉरेंट — अल्जेरियन-फ्रेंच फॅशन डिझायनर, यवेस सेंट लॉरेंटचे सहसंस्थापक
- १९३२: मीना कुमारी — हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९३२: मीर कहाणे — अमेरिकन-इस्त्रायली रब्बी आणि कार्यकर्ते, ज्यू डिफेन्स लीगचे संस्थापक
- १९३०: कॅरोली ग्रॉस — हंगेरी देशाचे ५१वे पंतप्रधान आणि राजकारणी
- १९२४: सर फ्रँक वॉरेल — वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
- १९२०: अण्णाणाऊ साठे — लेखक, कवी, समाजसुधारक
- १९१५: श्री. ज. जोशी — कथाकार कादंबरीकार
- १९१३: मास्टर भगवान — चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
- १८९९: कमला नेहरू — जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी
- १८९१: कार्ल कोबेल्ट — स्विस कॉन्फेडरेशनचे ५२वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १८८५: जॉर्ज डी हेवेसी — हंगेरियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १८८२: पुरुषोत्तम दास टंडन — राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष — भारतरत्न
- १८६३: गस्टोन डॉमेरगून — फ्रान्स देशाचे १३वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १८३५: महादेव मोरेश्वर कुंटे — भारतीय कवी व संस्कृतचे प्राध्यापक
- १७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क — फ्रेंच शास्त्रज्ञ
- १५२०: सिगिसमंड II — पोलिश राजा
- १३७७: गो-कोमात्सु — जपानी सम्राट
- १३१३: कोगोन — जपानी सम्राट
- १२६: पेर्टिनॅक्स — रोमन सम्राट
- १०६८: Emperor Taizu of Jin — चिनी सम्राट
- इ. स. पू १०: क्लॉडियस — रोमन सम्राट
निधन
- ९४६: Lady Xu Xinyue — चिनी राणी
- ५२७: जस्टिन आय — बायझंटाईन सम्राट
- २०२२: सारथी — भारतीय अभिनेते
- २००९: कोराझोन अक्विनो — फिलीपिन्स देशाचे ११वे राष्ट्राध्यक्ष
- २००८: हरकिशन सिंग सुरजीत — भारतीय वकील आणि राजकारणी
- २००८: हरकिशनसिंग सुरजित — मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
- २००८: अशोक मांकड — भारतीय क्रिकेटपटू
- २००५: फहाद — सौदी अरेबियाचा राजा
- १९९९: निराद चौधरी — बंगाली साहित्यिक — साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९६: मोहम्मद फराह एडीद — सोमालिया देशाचे ५वे अध्यक्ष, राजकारणी
- १९९६: तांडेउझ रेईच्स्टइन — पोलिश-स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९८२: टी. तिरुनावुकारासू — श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी
- १९७०: ओटो हेनरिक वॉरबर्ग — जर्मन चिकित्सक आणि फिजिओलॉजिस्ट — नोबेल पुरस्कार
- १९६७: रिचर्ड कुहन — ऑस्ट्रियन-जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९२०: बाळ गंगाधर टिळक — लोकमान्य
- १७१४: ऍनी — ग्रेट ब्रिटनच्या राणी
- ११४६: कीव च्या व्सेव्होलॉड II — रशियन राजकुमार
- ११३७: लुई (सहावा) — फ्रान्सचा राजा