१६ जून
घटना
- २०१३: उत्तराखंड ढगफुटी — केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
- २०१२: शेन्झोऊ ९ अंतराळयान — चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
- २०१०: भूतान — देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
- १९९०: — मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
- १९७७: ओरॅकल कॉर्पोरेशन — कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
- १९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा — या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
- १९४७: — नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
- १९१४: लोकमान्य टिळक — यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
- १९११: इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) — कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
- १९०३: फोर्ड मोटर — कंपनीची सुरवात.
जन्म
- १९९४: आर्या आंबेकर — गायिका
- १९६८: अरविंद केजरीवाल — दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक
- १९५०: मिथुन चक्रवर्ती — भारतीय अभिनेते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९३६: अखलाक मुहम्मद खान — ऊर्दू कवी — साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
- १९२०: हेमंत कुमार — गायक, संगीतकार आणि निर्माते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १८९७: जॉर्ज विटिग — जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १८७४: आर्थर मेघेन — कॅनड देशाचे ९वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
- ११३९: सम्राट कोनोए — जपान देशाचे सम्राट
निधन
- २०२०: हरिभाऊ माधव जावळे — भारतीय राजकारणी
- २०१५: चार्ल्स कोरिया — भारतीय आर्किटेक्ट — पद्म विभूषण, पद्मश्री
- २०१४: कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास — इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान
- १९९५: माई मंगेशकर — मंगेशकरांच्या मातोश्री
- १९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर — मराठी रंगभूमीवरील गायक-नट
- १९७१: जॉन रीथ — बीबीसीचे सह-संस्थापक
- १९५३: मार्गारेट बॉन्डफिल्ड — युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला
- १९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे — बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक
- १९३०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी — अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक
- १९२५: चित्तरंजन दास — भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी
- १८६९: चार्ल्स स्टर्ट — भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक
- १८६९: चार्ल्स स्टर्ट — भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक