२१ ऑगस्ट
घटना
- २०२२: भारत — भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.
- १९९३: — मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
- १९९१: — लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
- १९११: — पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
- १८८८: — विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
जन्म
- १९८६: उसेन बोल्ट — जमैकाचे धावपटू
- १९८१: टायलर विंकलेवॉस — अमेरिकन व्यापारी, ConnectU चे सह-संस्थापक
- १९८१: कॅमेरॉन विंकल्वॉस — अमेरिकन व्यापारी, ConnectU चे सह-संस्थापक
- १९७३: सर्गेइ ब्रिन — रशियन-अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि व्यापारी, Google चे सह-संस्थापक
- १९६३: मोहम्मद (सहावा) — मोरोक्को देशाचे राजा
- १९६१: व्ही. बी. चन्द्रशेखर — भारताचे फिरकी गोलंदाज
- १९५२: जिरी पारौबेक — झेक प्रजासत्ताक देशाचे ६वे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी
- १९४३: पेरी क्रिस्टी — बहामास देशाचे ३रे पंतप्रधान, राजकारणी
- १९३९: फेस्टस मोगे — बोत्सवाना देशाचे ३रे अध्यक्ष, बोत्सवाना अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- १९३७: डोनाल्ड डेवार — स्कॉटलंड देशाचे १ले पहिले मंत्री, स्कॉटिश राजकारणी
- १९३७: गुस्तावो नोबोआ — इक्वेडोर देशाचे ५१वे अध्यक्ष, शैक्षणिक आणि राजकारणी
- १९३४: सुधाकरराव नाईक — महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री
- १९२७: बी. सत्य नारायण रेड्डी — भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल
- १९२४: श्रीपाद दाभोळकर — गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ
- १९२१: टी.के. दोराईस्वामी — भारतीय कवी आणि लेखक
- १९१८: सिकंदर बख्त — भारतीय राजकारणी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री
- १९१०: नारायण बेंद्रे — भारतीय चित्रकार — पद्म भूषण, पद्मश्री
- १९०९: ना. घ. देशपांडे — कवी नागोराव घन
- १९०७: पी. जीवनंधम — भारतीय वकील आणि राजकारणी
- १९०५: बिपीन गुप्ता — भारतीय अभिनेते आणि निर्माते
- १८७१: गोपाळ कृष्ण देवधर — भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य
- १८५८: रुडॉल्फ — ऑस्ट्रिया देशाचे क्राउन प्रिन्स
- १७८९: ऑगस्टिन कॉशी — फ्रेन्च गणितज्ञ
- १७६५: विल्यम (चौथा) — इंग्लंडचे राजा
- १७५४: विल्यम मर्डोक — स्कॉटिश अभियंते आणि शोधक, गॅस लाइटिंगचे निर्माते
- १५५२: मुहम्मद कादिरी — कादरी आदेशाच्या नौशाहिया शाखेचे संस्थापक
निधन
- ६७२: सम्राट कोबून — जपान देशाचे सम्राट
- २००७: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन — अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल
- २००६: बिस्मिला खान — भारतीय ख्यातनाम सनईवादक, संगीतकार — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
- २००५: रॉबर्ट मूग — अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक
- २००५: मार्कस श्मक — फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
- २००४: सच्चिदानंद राउत्रे — भारतीय उडिया भाषा कवी
- २००१: शरद तळवलकर — भारतीय मराठी विनोदी अभिनेते
- २००१: शं. ना. अंधृटकर — मराठी रंगभूमीचे वारकरी
- २०००: निर्मला गांधी — समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा
- २०००: विनायकराव कुलकर्णी — स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी
- २०००: डॅनियल लिसुलो — झांबिया देशाचे ३रे पंतप्रधान, राजकारणी
- १९९५: सुब्रमण्यम चंद्रशेखर — भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १९९१: गोपीनाथ मोहंती — ओरिया साहित्यिक — ज्ञानपीठ पुरस्कार
- १९८१: काका कालेलकर — भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, पत्रकार — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९७८: विनू मांकड — भारतीय क्रिकेटपटू
- १९७७: प्रेमलीला ठाकरसी — एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू
- १९७६: पांडुरंग नाईक — प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर
- १९७१: जॉर्ज जॅक्सन — अमेरिकन कार्यकरर्ते आणि लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक
- १९६४: पाल्मिरो टोग्लियाट्टी — इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी
- १९६०: डेव्हिड बी स्टीनमन — अमेरिकन अभियंते, मॅकिनॅक ब्रिजचे रचनाकार
- १९४७: इटोर बुगाटी — इटालियन-फ्रेंच अभियंते आणि उद्योगपती, बुगाटी कंपनीचे संस्थापक
- १९४३: हेन्रिक पॉन्टोपिडन — डॅनिश पत्रकार आणि लेखक — नोबेल पुरस्कार
- १९४०: लिऑन ट्रॉट्स्की — रशियन क्रांतिकारक, सिद्धांतकार आणि राजकारणी, रेड आर्मीचे संस्थापक
- १९३१: पं. विष्णू दिगंबर पलुसकर — संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक
- १९१३: Ferenc Pfaff — हंगेरियन आर्किटेक्ट आणि शैक्षणिक, झाग्रेब सेंट्रल स्टेशनचे रचनाकार
- ११३१: राजा बाल्डविन दुसरा — जेरुसलेम देशाचे राजा