३ जून
घटना
- २०१९: खार्तूम हत्याकांड — सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला त्यात किमान १०० लोंकांचे निधन.
- २०१७: लंडन ब्रिज हल्ला — इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
- २०१५: — घाना मधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान २०० लोकांचे निधन.
- २०१३: — चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
- २०१२: राणी एलिझाबेथ (दुसरी) — यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
- २००६: मॉन्टेनेग्रो — सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांचे एकत्रीकरण होऊन हा देश स्वत्रंत झाला.
- १९९८: — जर्मनी मधील हायस्पीड रेल्वेचा यांत्रिकी बिघाडामुळे अपघात त्यात १०१ लोकांचे निधन.
- १९९१: माउंट अनझेन — जपानमधील क्युशू येथील ज्वालामुखीचा उद्रेक त्यात ४३ लोकांचे निधन.
- १९८९: चीन — थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या आंदोलकांना घालवण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली.
- १९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार — सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सैन्याने कारवाई सुरु केली.
- १९८०: १९८० ग्रँड आयलंड चक्रीवादळ — अमेरिकेतील नेब्रास्का मध्ये झालेल्या चक्रीवादळात ५ लोकांचे निधन तर ३० करोड डॉलर्स चे नुकसान.
- १९७९: इक्क्सटॉक १ — या मेक्सिकोच्या दक्षिणे आखातातील तेल विहिरीतील स्फोटामुळे किमान ३०लाख बॅरल तेल समुद्रात पसरले.
- १९७३: सोव्हिएत सुपरसॉनिक तुपोलेव्ह Tu-144 — या सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा फ्रान्स मध्ये अपघात, यात १४ लोकांचे निधन. हा सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा पहिला अपघात आहे.
- १९६५: जेमिनी ४ — नासाच्या जेमिनी ४ या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण. याच मोहिमेत एड व्हाईट हे स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन बनले.
- १९६२: एअर फ्रान्स फ्लाइट ००७ — या विमानाचा पॅरिस, ऑर्ली विमानतळावर स्फोट त्यात १३० लोकांचे निधन.
- १९५०: अन्नपूर्णा शिखर — मॉरिस हेर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी अन्नपूर्णा १ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शीखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
- १९४७: — हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
- १९४२: दुसरे महायुद्ध — अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
- १९४१: दुसरे महायुद्ध — जर्मनीने ग्रीक देशातील गाव कंडानोस जमीनदोस्त केले आणितिथल्या १८० रहिवाशांची हत्या केली.
- १९४०: दुसरे महायुद्ध — लुफ्तवाफेने पॅरिसवर बॉम्बहल्ला केला.
- १९४०: दुसरे महायुद्ध — डंकर्कच्या लढाईत जर्मनीचा विजय, दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने माघार घेतली.
- १९३५: निषेध ट्रेक, कॅनडा — एक हजार बेरोजगार कामगा मालवाहू गाड्यांवर चढले, त्यांनी ओटावा येथे निषेध ट्रेक आंदोलन सुरू केले.
- १८८९: — ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
- १८१८: मराठा साम्राज्य — मराठा साम्राज्याचा अस्त, शेवटचा पेशवा बाजीराव मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले.
जन्म
- १९३६: तरला दलाल
निधन
- २०१६: मुहम्मद अली — अमेरिकन मुष्टियोद्धा
- २०१४: गोपीनाथ मुंडे — महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
- २०१३: अतुल चिटणीस — भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार
- २०११: भजन लाल — भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री
- २०१०: अजय सरपोतदार — मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
- २००२: मेर्टन मिलर — अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
- १९९७: मीनाक्षी शिरोडकर — भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री
- १९९०: रॉबर्ट नोयस — इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
- १९८९: रुहोलह खोमेनी — इराणी धर्मगुरू आणि राजकारणी
- १९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल — ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १९५६: वीर वामनराव जोशी — स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
- १९३२: सर दोराबजी टाटा — उद्योगपती
- १६५७: विल्यम हार्वी — मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ