१० जून
घटना
- २००३: मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन — नासाचे स्पिरिट रोव्हर लाँच करून मिशनची सुरवात.
- २००२: केविन वॉर्विक — यांनी दोन मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग युनायटेड किंगडम मध्ये केला.
- २००१: संत रफ्का — पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी लेबनॉनच्या पहिल्या महिला संत, संत रफ्का यांना मान्यता दिली.
- १९९९: उस्ताद झाकीर हुसेन — यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
- १९९४: चीन — एरिया C (बेशान), लोप नूर येथे अणुचाचणी केली.
- १९८२: लेबनॉन युद्ध — सुलतान याकूबची लढाई: सीरियन अरब सैन्याने इस्रायली संरक्षण दलाचा पराभव केला.
- १९८२: — दृष्टी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
- १९८०: नेल्सन मंडेला — दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचे आवाहन केले.
- १९७७: अँपल इन्क — अँपल-II संगणक प्रकाशित.
- १९६७: सहा दिवसांचे युद्ध — इस्रायल आणि सीरिया युद्ध संपवण्यास मंजुरी दिली.
- १९६३: १९६३ चा समान वेतन कायदा, अमेरिका — लिंगावर आधारित वेतन असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला.
- १९५७: कॅनडा — जॉन डायफेनबेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह पार्टीने २२ वर्षांचे लिबरल पक्षाचे सरकार संपुष्टात आणले.
- १९४४: दुसरे महायुद्ध — ओराडोर-सुर-ग्लेन हत्याकांड: फ्रांस मधील ओराडोर-सुर-ग्लेन ६४२ लोकांची हत्या.
- १९४४: दुसरे महायुद्ध — डिस्टोमो हत्याकांड: ग्रीसमधील डिस्टोमो येथे जर्मन सैन्याने २१८ लोकांची हत्या केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध — ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
- १९४२: दुसरे महायुद्ध — लिडिस हत्याकांड: ओबर्गरुपेनफ्युहरर रेनहार्ड हेड्रिच यांच्या हत्येचा बदला.
- १९४०: दुसरे महायुद्ध — फॅसिस्ट इटलीने फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमवर युद्ध घोषित केले.
- १९४०: दुसरे महायुद्ध — नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९३५: अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस — स्थापना.
- १९२४: ज्याकोमो मॅट्टेओटी — इटलीचे समाजवादी नेते, यांची हत्या.
- १७६८: मराठा साम्राज्य — माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाले.
जन्म
- १९८२: तारा लिपिन्स्की — अमेरिकन फिगर स्केटर, सर्वात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या — ऑलम्पिक सुवर्ण पदक
- १९५५: प्रकाश पदुकोण — भारतीय बॅडमिंटनपटू — पद्मश्री
- १९४०: योगेंद्र माकवाना — भारतीय राजकारणी, माजी खासदार
- १९३८: एन. भाट नायक — भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक
- १९३८: राहुल बजाज — बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स — पद्म भूषण
- १९२४: के. भालचंद्र — नेत्रशल्यविशारद
- १९१६: विल्यम रोसेनबर्ग — डंकिन डोनट्सचे स्थापक
- १९०८: जनरल जयंतोनाथ चौधरी — भारताचे ५वे लष्करप्रमुख — पद्म विभूषण
- १२१३: फख्रुद्दीन इराकी — पर्शियन तत्त्वज्ञ
निधन
- २०१३: डग बेली — अमेरिकन राजकीय सल्लागार, हॉटलाइनचे संस्थापक
- २००१: फुलवंतीबाई झोडगे — सामाजिक कार्यकर्त्या
- २०००: हाफेज अलअसद — सीरिया देशाचे २०वे राष्ट्राध्यक्ष
- १९७६: ऍडॉल्फ झुकॉर — पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक
- १९५५: मार्गारेट ऍबॉट — भारतीय-अमेरिकन गोल्फर
- १९४९: सिग्रिड अंडसेट — डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक — नोबेल पारितोषिक
- १९४०: मार्कस गार्वे — जमैकन पत्रकार आणि कार्यकर्ता, ब्लॅक स्टार लाइनचे संस्थापक
- १९१४: ओडॉन लेचनर — हंगेरियन वास्तुविशारद, उपयोजित कला संग्रहालय आणि सेंट एलिझाबेथ चर्चचे रचनाकार
- १९०६: गुलाबदास ब्रोकर — गुजराती लेखक व समीक्षक — पद्मश्री
- १९०३: लुइ गीक्रेमॉना — इटालियन गणितज्ञ
- १८३६: आंद्रे-मरी ऍम्पियर — फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ