२६ जून
घटना
- २०००: पी. बंदोपाध्याय — या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
- १९९९: — नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
- १९९७: हॅरी पॉटर कादंबरी मालिका — जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन हि मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.
- १९७९: मुहम्मद अली — यांनी व्यायवसायिक बॉक्सिंग मधून निवृत्ती घेतली.
- १९७७: एल्व्हिस प्रेस्ली — यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
- १९७५: — सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
- १९७४: युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (बारकोड) — वस्तू विकण्यासाठी पहिल्यांदाच बारकोडचा उपयोग करण्यात आला.
- १९७४: अमेरिका — अमेरिकेत सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
- १९६८: — पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
- १९६०: सोमालीलँड — देशाने स्वातंत्र्य मिळवले.
- १९६०: मादागास्कर — देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९५९: — स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
- १९४४: दुसरे महायुद्ध — ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.
- १९३६: फॉके-वुल्फ Fw 61 — या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.
- १९०६: ग्रँड प्रिक्स मोटर रेस — पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस ले मॅन्स येथे आयोजित करण्यात आली.
- १८१९: — सायकलचे पेटंट देण्यात आले.
- १७२३: — रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
जन्म
- १९५१: गॅरी गिल्मोर — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
- १९४२: सारथी — भारतीय अभिनेते
- १९३७: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन — अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
- १९२६: महेंद्र भटनागर — भारतीय कवी
- १९१४: सुलतान अहमद नानुपुरी — बांगलादेशी इस्लामिक विद्वान आणि शिक्षक
- १९१४: शापूर बख्तियार — ईराणचे ७४ वे पंतप्रधान
- १९११: फ्रेडरिक कॅलंड विल्यम्स — ब्रिटिश संशोधक, विल्यम्स-किल्बोर्न ट्यूबचे संशोधक सह-शोधक
- १९०८: साल्वादोर ऍलेंदे — चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति
- १९०६: एम. पी. शिवग्नम — भारतीय लेखक व राजकारणी — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९०६: मा. पो. सि. — भारतीय लेखक आणि राजकारणी
- १८९२: पर्ल एस. बक — अमेरिकन लेखिका — नोबेल पुरस्कार
- १८९२: बेसी कोलमन — आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक
- १८८८: बालगंधर्व — गायक व नट — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १८७३: गौहर जान — भारतातील ७८ rpm रेकॉर्डवर संगीत रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या कलाकारांपैकी एक
- १८७३: अँजेलिना येओवार्ड — गायिका व नर्तिका
- १८२४: लॉर्ड केल्व्हिन — इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
- १८२१: बार्टोलोमे मिटर — अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष
- १६९४: जॉर्ज ब्रांड — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ
निधन
- ३६३: ज्युलियन — रोमन सम्राट
- २०२२: व्ही. कृष्णमूर्ती — भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
- २००५: एकनाथ सोलकर — अष्टपैलू क्रिकेटपटू
- २००४: यश जोहर — भारतीय चित्रपट निर्माते
- २००१: व. पु. काळे — लेखक व कथाकथनकार
- १९८०: आप्पा पेंडसे — पत्रकार
- १९५५: एंगलबर्ट जशचा — मानव-सक्षम विमानांचे निर्मिते
- १९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर — ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १८३०: जॉर्ज चौथा — युनायटेड किंगडमचे जॉर्ज
- १८१०: जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र — हॉट एअर बलूनचे सहसंशोधक
- १८१०: जोसेफ-मिशेल माँटगोल्फियर — फ्रेंच हॉट एअर बलून कंपनीचे संशोधक
- १५३१: वल्लभाचार्य — पुष्टि पंथाचे संस्थापक