३ ऑगस्ट
घटना
- २००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका — ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
- २०००: शाजी एन. करुण — मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
- १९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड — या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
- १९९४: अनिल विश्वास — संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
- १९७७: TRS-८० कॉम्पुटर — टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
- १९६०: नायजेरिया — देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९४९: नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन — बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
- १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) — स्थापना झाली.
- १९४०: दुसरे महायुद्ध — इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
- १९३६: — आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
- १९१४: एडॉल्फ हिटलर — यांनी बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
- १९१४: पहिले महायुद्ध — जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.
- १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी — स्थापन झाली.
- १८५९: अमेरिकन डेंटल असोसिएशन — ची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.
- १८११: जंगफ्राऊ शिखर — या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
- १७८३: माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान — या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
- १०४६: सांताक्लॉज लँड, थीम पार्क — जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.
जन्म
- १९८६: शार्लोट कॅसिराघी — मोनेगास्क पत्रकार, एव्हर मॅनिफेस्टोचे सह-संस्थापक
- १९८४: सुनील छेत्री — भारतीय फुटबॉलपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न
- १९६४: अभिजित वेज्जाजिवा — थायलंड देशाचे २७वे पंतप्रधान, इंग्रजी-थाई अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- १९६०: गोपाल शर्मा — भारतीय क्रिकेटपटू
- १९५९: कोइची टनाका — जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते — नोबेल पुरस्कार
- १९५६: बलविंदरसिंग संधू — भारतीय क्रिकेटपटू
- १९५०: अर्नेस्टो सॅम्पर — कोलंबिया देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- १९४८: जीन-पियरे रॅफरिन — फ्रान्स देशाचे १६६वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
- १९४७: सिद्धरामय्या — कर्नाटक राज्याचे २२वे मुख्यमंत्री, वकील आणि राजकारणी
- १९३९: अपूर्व सेनगुप्ता — भारतीय क्रिकेटपटू
- १९३९: जॉन स्कली — अमेरिकन उद्योगपती, Zeta Interactive चे सहसंस्थापक
- १९३६: छन्नूलाल मिश्रा — बनारस घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
- १९३४: जोनास साविम्बी — अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर
- १९३०: मिचल कोव्हाच — स्लोव्हाकिया देशाचे पहिले अध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १९२४: लिऑन युरिस — अमेरिकन कादंबरीकार
- १९१६: शकील बदायूँनी — गीतकार आणि शायर
- १९०७: अर्नेस्टो गिझेल — ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
- १९०७: यांग शांगकुन — चीन देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, आणि राजकारणी
- १९०३: हबीब बोरगुइबा — ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
- १९००: क्रांतिसिंह नाना पाटील — स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते
- १८९८: उदयशंकर भट्ट — आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार
- १८९०: कॉन्स्टँटिन मेलनिकोव्ह — रशियन आर्किटेक्ट, रुसाकोव्ह वर्कर्स क्लबचे रचनाकार
- १८८६: मैथिलिशरण गुप्त — भारतीय हिंदी कवी — पद्म भूषण
- १८५६: आल्फ्रेड डेकिन — ऑस्ट्रेलिया देशाचे २रे पंतप्रधान
- १८११: अलीशा ओटिस — अमेरिकन व्यावसायिक, ओटिस लिफ्ट कंपनीचे संस्थापक
- १८०३: जोसेफ पॅक्सटन — इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद, क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार
निधन
- २०२२: मिथिलेश चतुर्वेदी — भारतीय अभिनेते
- २०२०: जॉन ह्यूम — आयरिश राजकारणी — नोबेल पुरस्कार
- २००९: निकोलाओस मकारेझोस — ग्रीस देशाचे उपपंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी
- २००८: अलेक्झांडर सोलझेनित्सिन — रशियन कादंबरीकार, नाटककार आणि इतिहासकार — नोबेल पारितोषिक
- २००७: सरोजिनी वैद्य — लेखिका
- १९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती — भारतीय अध्यात्मिक गुरू
- १९७९: बर्टील ओहलिन — स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पुरस्कार
- १९७७: मॅकरिओस तिसरा — सायप्रस प्रजासत्ताक देशाचे पहिले अध्यक्ष, आर्चबिशप आणि राजकारणी
- १९५७: देवदास गांधी — हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र
- १९४२: रिचर्ड विलस्टाटर — जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९३०: व्यंकटेश बापूजी केतकर — आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद
- १९२९: एमिल बर्लिनर — जर्मन-अमेरिकन शोधक आणि व्यावसायिक, ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक
- १८८१: विल्यम फार्गो — अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक
- १५४६: अँटोनियो दा सांगालो धाकटा — इटालियन आर्किटेक्ट, अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार
- १४६०: जेम्स दुसरा — स्कॉटलंडचे राजा