२०२०:बेरूत, लेबनॉन स्फोट— येथे झालेल्या भीषण विस्फोटामध्ये किमान २२० लोकांचे निधन तर तर ३ लाख पेक्षा जास्तलोक बेघर.
२००७:फिनिक्स— हे नासाचे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
२००१:— भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
१९९८:कोरेझॉन अॅक्विनो— फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा, यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९३:राजेन्द्र खंडेलवाल— यांनी अपंग असून सुद्धा समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुट उंचीवर असलेली खारदुंग ला ही खिंड कायनेटिक होंडा स्कूटरवर पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
१९८४:अपर व्होल्टा / बुर्किना फासो— अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.
१९५६:भाभा अणुशक्ती केंद्र, तुर्भे— येथे सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९४७:सर्वोच्च न्यायालय, जपान— स्थापना झाली.
१९२४:— सोविएत युनियन व मेक्सिको देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९१५:पहिले महायुद्ध— १९१५ ची ग्रेट रिट्रीट: जर्मन सैन्याने वॉर्सावर कब्जा केला.
१९१४:पहिले महायुद्ध— जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
१८५४:जपान— देशाच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
१७९६:फ्रेंच क्रांतिकारक युद्ध— लोनाटोची लढाई: नेपोलियनने इटलीच्या फ्रेंच सैन्याला विजय मिळवून दिला.
१७८३:माउंट असामा, जपान ज्वालामुखी— येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान १४०० लोकांचे निधन.
जन्म
१८४५:सर फिरोजशहा मेहता— भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते
निधन
२२१:लेडी झेन— चीनी सम्राज्ञी
२०२२:जी. एस. पणिकर— भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
२०२०:शिवाजीराव पाटील निलंगेकर— महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री
२००६:नंदिनी सत्पथी— भारतीय लेखक व राजकारणी
२००३:फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स— अमेरिकन बालरोगतज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९९७:जीन काल्मेंट— १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला
१९७७:एडगर एड्रियन— इंग्रजी फिजिओलॉजिस्ट — नोबेल पुरस्कार
१९५७:वॉशिंग्टन लुइस— ब्राझील देशाचे १३वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
१९३७:डॉ. काशीप्रसाद जायस्वाल— प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
१७१८:रेने लेपेज डी सेंट-क्लेअर— रिमोस्की देशाचे फ्रेंच-कॅनेडियन संस्थापक