१२ मार्च
घटना
- २००१: — ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- १९९९: — चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.
- १९९३: — मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
- १९९२: — स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
- १९९१: — जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.
- १९६८: — मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.
- १९३०: — महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
- १९१८: — रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
- १९११: — कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
- १८९४: — कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
जन्म
- १९८४: श्रेया घोशाल — प्रसिध्द पार्श्वगायिका — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९३३: विश्वनाथ नरवणे — लेखिका कविता
- १९३१: हर्ब केलेहर — साउथवेस्ट एअरलाईन्सचे सहसंस्थापक
- १९१३: यशवंतराव चव्हाण — भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
- १९११: भाऊसाहेब बांदोडकर — गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक
- १८९१: चिंतामणराव कोल्हटकर — अभिनेते व निर्माते नटवर्य
- १८२४: गुस्ताव्ह किरचॉफ — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
निधन
- २०२१: तपन कुमार सरकार — भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक
- २००३: झोरान दिंडीक — सर्बिया देशाचे ६वे पंतप्रधान, तत्त्वज्ञ आणि राजकारणी
- २००१: रॉबर्ट लुडलुम — अमेरिकन लेखक
- १९६०: क्षितीमोहन सेन — भारतीय इतिहासकार
- १९४२: रॉबर्ट बॉश — बॉश कंपनीचे संस्थापक
- १९२५: सन यट-सेन — चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष
- १८९९: ज्युलियस वोगेल — न्यूझीलंड देशाचे ८वे पंतप्रधान