१९९८:
भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.
१९८५:
भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन ऍण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.
१९७२:
वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
१९५२:
केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
१८७६:
अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
१८६२:
अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024