१ फेब्रुवारी - दिनविशेष
२०१३:
जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
२००४:
मक्का हज यात्रेतील चेंगराचेंगरीत २५१ निधन तर २४४ लोक जखमी झाले.
२००३:
अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
१९९२:
भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन ऍंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१:
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्याचेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसाचेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
पुढे वाचा..
१९८२:
शोएब मलिक - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७१:
अजय जडेजा - भारतीय क्रिकेटपटू
१९६०:
जॅकी श्रॉफ - अभिनेते
१९३९:
डॉ. कल्लाम अंजी रेड्डी - डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन:
१५ मार्च २०१३)
१९३१:
बोरिस येल्तसिन - रशियाचे पहिले अध्यक्ष (निधन:
२३ एप्रिल २००७)
पुढे वाचा..
२०२३:
परिमल डे - भारतीय फुटबॉलपटू (जन्म:
४ मे १९४१)
२०१२:
अनिल मोहिले - संगीतकार व संगीत संयोजक
२००३:
कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म:
१७ मार्च १९६२)
१९८१:
डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर - डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (जन्म:
६ एप्रिल १८९२)
१९७६:
जॉर्ज व्हिपल - अमेरिकन फिजिशियन आणि पॅथॉलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार (जन्म:
२८ ऑगस्ट १८७८)
पुढे वाचा..