१ फेब्रुवारी घटना - दिनविशेष

  • जागतिक बुरखा हिजाब दिन

२०१३: जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
२००४: मक्का हज यात्रेतील चेंगराचेंगरीत २५१ निधन तर २४४ लोक जखमी झाले.
२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन ऍंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्याचेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसाचेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९७९: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका - हे रेडिओ केंद्र सुरु झाले.
१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत.
१६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024