३ मे - दिनविशेष

  • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

३ मे घटना

१९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

पुढे वाचा..३ मे जन्म

१९५९: उमा भारती - भाजपाच्या जेष्ठ नेत्या
१९५१: अशोक गेहलोत - राजस्थानचे १४वे मुख्यमंत्री
१९२४: केन टायरेल - टायरेल रेसिंगचे संस्थापक (निधन: २५ ऑगस्ट २००१)
१८९८: गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: ८ डिसेंबर १९७८)
१८९७: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (निधन: २६ नोव्हेंबर १९९४)

पुढे वाचा..३ मे निधन

२००९: राम बाळकृष्ण शेवाळकर - जेष्ठ साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)
२००६: प्रमोद महाजन - केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)
२०००: शकुंतला परांजपे - भारतीय समाजसेविका (जन्म: १७ जानेवारी १९०६)
१९९६: वसंत गवाणकर - व्यंगचित्रकार
१९८१: नर्गिस दत्त - हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024