४ मे
घटना
- २०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक — युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.
- १९९६: — जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
- १९९५: — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
- १९९२: — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- १९८९: — सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
- १९७९: — मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- १९६७: — श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९५९: — पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
- १९१०: — रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
- १९०४: — अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
- १८५४: — भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
- १७९९: — श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
जन्म
- १९८४: मंजुरूल इस्लाम — बांगला देशचा क्रिकेटपटू
- १९४५: एन. राम — ज्येष्ठ पत्रकार
- १९४३: प्रसांत पटनाईक — भारतीय अर्थशास्त्रज्ञ
- १९४२: सॅम पित्रोदा — विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार
- १९४१: परिमल डे — भारतीय फुटबॉलपटू
- १९४०: रॉबिन कुक — इंग्लिश कादंबरीकार
- १९३४: अरुण दाते — भावगीत गायक
- १९२९: आँड्रे हेपबर्न — अँग्लो-डच अभिनेत्री
- १९२९: बाबा कदम — गुप्तहेरकथालेखक
- १९२८: होस्नी मुबारक — इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष
- १९१८: तनाका काकुऐ — जपानचे पंतप्रधान
- १९१४: माइडायम ऐगोरो — जपानी सुमो पैलवान, ३९वे योकोझुना
- १८४७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन — लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य
- १८२५: थॉमस हक्सले — ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक
- १६६४: एलिसाबेथ थेरेस डी लॉरेन — फ्रेंच नोबल वुमन आणि एपिनॉयच्या राजकुमारी
- १६४९: छत्रसाल बुंदेला — बुंदेलखंडचे महाराजा
- १००८: ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी — पर्शियन सूफी संत
- १००८: हेन्री — फ्रान्सचा राजा
निधन
- १७९९: टिपू सुलतान — म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ