१४ एप्रिल - दिनविशेष


१४ एप्रिल घटना

१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिऱ्या;याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

पुढे वाचा..



१४ एप्रिल जन्म

१९४३: रामदास फुटाणे - वात्रटिकाकार
१९२७: द. मा. मिरासदार - विनोदी लेखक
१९२२: उस्ताद अली अकबर खान - मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १८ जून २००९)
१९१९: शमशाद बेगम - पार्श्वगायिका (निधन: २३ एप्रिल २०१३)
१९१९: के. सरस्वती अम्मा - भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: २६ डिसेंबर १९७५)

पुढे वाचा..



१४ एप्रिल निधन

२०१३: राम प्रसाद गोएंका - उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)
१९९७: चंदू पारखी - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
१९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया - स्थापत्य अभियंता आणि राजकारणी - भारतरत्न (जन्म: १५ सप्टेंबर १८६१)
१९५०: वेंकटरमण अय्यर - भारतीय तत्त्ववेत्ते (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

पुढे वाचा..



मे

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023