२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.
जन्म
२०००:आयुष महेश खेडेकर— भारतीय अभिनेता
१९८४:सबा कमर— पाकिस्तानी अभिनेत्री-मॉडेल
१९८३:शिखा उबेरॉय— भारतीय-अमेरिकन टेनिसपटू
१९८१:मायकेल ए. मन्सूर— अमेरिकन नाविक — सन्मान पदक
१९६९:रवींद्र प्रभात— भारतीय लेखक आणि पत्रकार
१९६६:आसिफ मांडवी— भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते
१९६२:किर्सन इल्युमझिनोव्ह— काल्मिकियाचे पहिले अध्यक्ष, रशियन व्यापारी आणि राजकारणी
१९५८:लसंथा विक्रमतुंगे— श्रीलंकेचे वकील आणि पत्रकार
१९५७:सेबॅस्टियन अदयनथरथ— भारतीय बिशप
१९५१:उबोल रतन— थाई राजकुमारी
१९५१:डीन कामेन— अमेरिकन शोधक आणि उद्योगपती, Segway Inc चे संस्थापक
१९४७:ग्लोरिया मॅकापागल अरोयो— फिलीपिन्स देशाचे १४वे अध्यक्ष, शैक्षणिक आणि राजकारणी
१९४७:वीरेंद्र शर्मा— भारतीय-इंग्रजी वकील आणि राजकारणी
१९३९:लेका आय— अल्बेनियाचे क्राउन प्रिन्स
१९३९:हैदर अबू बकर अल-अत्तास— येमेन देशाचे पंतप्रधान