२०००:— उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
१९९८:— भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण, राजस्थान येथे केली.
१९९६:— ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
१९९५:— ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
१९७०:— नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१९६७:— डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
१९६२:— भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९५२:— भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
१९५०:— फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिली रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.
१९३९:— अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
१८८०:थॉमस अल्वा एडिसन— यांनी विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.