२१ जुलै घटना
-
२०२२: द्रौपदी मुर्मू — यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.
-
२०१२: एर्डन एरुस — यांनी जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली.
-
२००८: राम बरन यादव — यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले.
-
२००२: वर्ल्ड कॉम — कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
-
१९८३: अंटार्क्टिका — खंडातील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस यापृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
-
१९७७: लिबिया-इजिप्शियन युद्ध — सुरुवात.
-
१९७०: अस्वान हाय धरण, इजिप्त — हे जगातील सर्वात मोठे बंधारा धरण ११ वर्षांच्या बांधकामानंतर पूर्ण झाले.
-
१९६१: मर्क्युरी-रेडस्टोन ४ मिशन — गुस ग्रिसम हे अंतराळात जाणारे दुसरे अमेरिकन बनले.
-
१९६१: अमेरिकन नागरिकी युद्ध — बुल रनची पहिली लढाई: युद्धाची पहिली मोठी लढाई सुरू झाली आणि संपली.
-
१९५९: एनएस सवाना — हे पहिले अणुऊर्जेवर चालणारे मालवाहू जहाज कार्यरत झाले.
-
१९५४: पहिले इंडोचिनी युद्ध — जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — ग्वामची लढाई: अमेरिकन सैन्याने ग्वामवर उतरले आणि या लढाईची सुरवात झाली.
-
१९४४: क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्ग — ऍडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्ह्यासाठी फाशी.
-
१९२५: माल्कम कॅम्पबेल — हे जमिनीवरील १५० माइल्स प्रति तास (150mph - 241kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले.
-
१९०४: लुई रिगोली — हे जमिनीवरील १०० माइल्स प्रति तास (100mph - 161kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले.
-
१८३१: बेल्जिअम — देशाचा पहिला राजा लिओपॉल्ड यांचा शपथविधी झाला.
-
इ.स.पू. ३५६: एफिसस आर्टेमिस — मंदिर नष्ट झाले.