२१ सप्टेंबर घटना
-
२०२२: रशिया — अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंशिक एकत्रीकरण करण्याची घोषणा केली.
-
१९९९: ची-ची भूकंप — तैवानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान २४०० लोकांचे निधन.
-
१९९१: आर्मेनिया — देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
-
१९८४: संयुक्त राष्ट्र — ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
-
१९८१: सँड्रा डे ओ'कॉनर — यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून अमेरिकन सिनेटने एकमताने मान्यता दिली.
-
१९८१: बेलिझे — देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
-
१९७६: संयुक्त राष्ट्र — सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
-
१९७१: संयुक्त राष्ट्र — बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
-
१९६८: रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (RAW) — या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
-
१९६५: संयुक्त राष्ट्र — गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
-
१९६४: XB-70 वाल्कीरी — या जगातील सर्वात वेगवान बॉम्बर विमानाचे पहिले उड्डाण.
-
१९६४: माल्टा — देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
-
१९४२: बोइंग बी-29 सुपरफोर्ट्रेस — या विमानाचे पहिले उड्डाण.
-
१९४२: युक्रेन होलोकॉस्ट — युक्रेनमधील दुनैवत्सी येथे नाझींनी २,५८८ ज्यूं लोकांची हत्या केली.
-
१९३४: होन्शु वादळ — या वादळामुळे जपानमधील किमान ३ हजार लोकांचे निधन.
-
१७९२: फ्रान्स — राजेशाही साम्राज्य बरखास्त होऊन फ्रेंच प्रजासत्ताक सुरु झाले.