५ फेब्रुवारी घटना
घटना
- १२९४: – अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
- १६७०: – सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
- १७६६: – माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
- १९१९: – चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
- १९२२: – रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
- १९४५: – दुसरे महायुद्ध जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
- १९४८: – गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
- १९५२: – स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
- १९५८: – ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
- १९६२: – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
- २००३: – भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
- २००४: – पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.