७ ऑक्टोबर घटना
-
२००८: लघुग्रह २००८ TC3 — ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहाचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला.
-
२००१: अफगाणिस्तान हल्ला — सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
-
१९९६: फॉक्स न्यूज चॅनल — प्रसारण सुरू होते.
-
१९८७: खलिस्तान — शीख राष्ट्रवादीं लोकांनी भारतापासून खलिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही.
-
१९७७: सोव्हिएत युनियन — चौथी राज्यघटना स्वीकारली गेली.
-
१९७१: संयुक्त राष्ट्र — ओमान देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
-
१९६३: आंशिक अणु चाचणी बंदी करार — अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी या कराराच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली.
-
१९५९: प्रोब लुना 3 — सोव्हिएत अंतराळयानाने चंद्राच्या दूरच्या बाजूची पहिली छायाचित्रे प्रसारित केली.
-
१९५०: मिशनरीज ऑफ चॅरिटी — मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली.
-
१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) — स्थापना.
-
१९४०: दुसरे महायुद्ध — मॅकॉलम मेमो: जपानी लोकांना अमेरिकेवर हल्ला करण्यास चिथावणी देऊन अमेरिकेला युरोपमधील युद्धात आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
-
१९३३: एअर फ्रान्स — पाच छोट्या कंपन् एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.
-
१९१९: के. एल. एम. (KLM) — या विमान कंपनीची स्थापना झाली. ही सर्वात जुनी एअरलाइन आहे जी अजूनही तिच्या मूळ नावाने कार्यरत आहे.
-
१९१९: नवजीवन — महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.
-
१९१३: फोर्ड मोटर कंपनी — पहिली फिरती वाहन असेंबली लाइन सादर केली.
-
१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज — सुरू झाले.
-
१९०५: — पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयन्त होता.
-
१८२६: ग्रॅनाइट रेल्वे — अमेरिकेमधील पहिली चार्टर्ड रेल्वे म्हणून काम सुरू केले.
-
इ.स.पू. ३७६१: जगाचा पहिला दिवस — हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.