१६ सप्टेंबर घटना - दिनविशेष


१९९२: ब्लॅक वेनस्डे - ब्रिटीश पौंड युरोपियन विनिमय दर यंत्रणेतून बाहेर काढले गेले आणि जर्मन मर्कच्या तुलनेत त्याचे अवमूल्यन करण्यास भाग पाडले गेले.
१९८७: मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
१९७८: ताबास भूकंप, इराण - या ७.४ मेगावॅटच्या भूकंपामुळे इराण मधील किमान१५ हजार लोकांचे निधन.
१९७५: संयुक्त राष्ट्र - केप वर्दे, मोझांबिक आणि साओ टोमे आणि प्रिन्सिप संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
१९७५: मिकोयान मिग-31 इंटरसेप्टर - या विमानाच्यापहिल्या प्रोटोटाइपने पहिले उड्डाण केले.
१९७५: पापुआ न्यूगिनी - देशाला ऑस्ट्रेलियापासुन स्वातंत्र्य.
१९७०: ब्लॅक सप्टेंबर - जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली, हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.
१९६३: मलाया / मलेशिया - देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
१९६१: टायफून नॅन्सी, जपान - उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.
१९६१: अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोग, पाकिस्तान - स्थापना.
१९५९: पहिले झेरॉक्स मशीन - झेरॉक्स ९१४, या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक, न्यू यॉर्क अमेरिका येथे देण्यात आले.
१९५६: TCN-9, सिडनी - हे नियमित प्रसारण सुरू करणारे पहिले ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन स्टेशन सुरु झाले.
१९५५: बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी - सोव्हिएत युनियनची झुलू-श्रेणीची पाणबुडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारी पहिली पाणबुडी बनली.
१९४५: दुसरे महायुद्ध - हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
१९४०: दुसरे महायुद्ध - इटालियन सैन्याने सिदी बरानी जिंकले.
१९३५: बँक ऑफ महाराष्ट्र - इंडियन कंपनीज ऍक्ट अन्वये नोंदणी.
१९२०: वॉल स्ट्रीट बॉम्बस्फोट - न्यूयॉर्क शहरातील जे.पी. मॉर्गन इमारतीसमोर बॉम्बस्फोट हल्ल्यात किमान ३८ लोकांचे निधन तर ४०० लोक जखमी
१९१४: पहिले महायुद्ध - प्रझेमिसल (सध्याचे पोलंड) चा वेढा सुरू झाला.
१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन - कंपनीची स्थापना.
१८६३: रॉबर्ट कॉलेज, इस्तंबूल - अमेरिका देशबाहेरील पहिली अमेरिकन शैक्षणिक संस्था ख्रिस्तोफर रॉबर्ट यांनी स्थापन केली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024