२०१८:
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचे लग्न सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर येथे झाले.
२०००:
स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल अटलांटिस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुन्हा सामान पुरवण्यासाठी STS-101 मिशनवर प्रक्षेपित केले.
१९९६:
स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल एंडेव्हर यान मिशन STS-77 साठी प्रक्षेपित केले .
१९७१:
मार्स प्रोब प्रोग्राम - सोव्हिएत युनियनने मार्स २ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
.
१९६३:
मार्टिन लूथर किंग जूनियर - यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने प्रकाशित केले.
१९६१:
बंगाली भाषा चळवळ - बंगाली भाषेला राज्य मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन, आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ लोकांचे निधन.
१९११:
पार्कस कॅनडा - ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१७४३:
जीन पियरे क्रिस्टीन - यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१५३६:
इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको ऍन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024