३ डिसेंबर घटना
घटना
- १७९६: – दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
- १८१८: – इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
- १८२९: – लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
- १८७०: – बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
- १९२७: – लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
- १९६७: – डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
- १९७१: – पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
- १९७९: – आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
- १९८४: – भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
- १९९४: – जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.