५ नोव्हेंबर घटना - दिनविशेष

  • महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

२०१३: मार्स ऑर्बिटर मिशन - भारताने पहिले इंटरप्लॅनेटरी प्रोब प्रक्षेपित केले.
२००७: चांगई १ - चीनचा पहिला चंद्र उपग्रह चंद्राभोवती कक्षेत गेला.
२००७: अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम - गुगलने अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अनावरण केली.
२००६: सद्दाम हुसेन - इराकचे माजी अध्यक्ष यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९६: पाकिस्तान - पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सरकार बरखास्त झाले आणि नॅशनल असेंब्ली विसर्जित झाली.
१९५१: पश्चिम रेल्वे - बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वेविलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
१९५०: कोरियन युद्ध - पाकचोनची लढाई: ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन सैन्याने चीनच्या सैन्याला यशस्वीरित्या रोखले.
१९४५: संयुक्त राष्ट्र - कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९४३: दुसरे महायुद्ध - व्हॅटिकनवर बॉम्बस्फोट.
१९४०: फ्रँकलिन डी. रुझवेल्ट - हे तिसऱ्यांदा निवडून आलेले अमेरिकेचे पहिले आणि एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत.
१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनी - मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
१९२५: सिडनी रेली - २०व्या शतकातील पहिले 'सुपर-स्पाय' यांना सोव्हिएत युनियनने फाशी दिली.
१९१६: पोलंड - जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सम्राटांच्या कायद्याद्वारे पोलंडचे राज्य घोषित केले गेले.
१९१४: पहिले महायुद्ध - फ्रान्स आणि ब्रिटिश साम्राज्याने ऑट्टोमन साम्राज्यावर युद्ध घोषित केले.
१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन - यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
१८७२: सुसान बी. अँथनी - यांनी महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत मतदान केल्यामुळे त्यांना १०० डॉलर दंड करण्यात आला.
१८४३: सीता स्वयंवर - या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१८२४: अमेरिका - न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
१८१७: मराठा साम्राज्य - इंग्रजांकडून दुसरे बाजीराव सैन्याचा पराभव झाला.
१५५६: पानिपतची दुसरी लढाई - दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
१४९९: कॅथोलिकॉन - १४६४ मध्ये जेहान लागेड्यूक यांनी लिहिलेले कॅथोलिकॉन प्रकाशित झाले, हे पहिले ब्रेटन शब्दकोश तसेच पहिले फ्रेंच शब्दकोश आहे.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024