२३ ऑगस्ट घटना
घटना
- १९१४: – पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४२: – दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
- १९६६: – लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
- १९९०: – आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
- १९९१: – वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
- १९९७: – हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
- २००५: – कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- २०११: – लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
- २०१२: – राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.