२४ जुलै घटना - दिनविशेष


२०१९: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान बनले.
२०००: विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम - ह्या भारताच्या पहिला महिला ग्रँडमास्टर बनल्या.
१९९७: महाश्वेतादेवी - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९८७: हुल्डा क्रुक्स - यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाई केली. त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या.
१९७७: लिबिया-इजिप्शियन युद्ध - समाप्ती.
१९६९: अपोलो प्रोग्राम - अपोलो ११ अंतराळयान प्रशांत महासागरात सुरक्षितपणे खाली पडले.
१९६९: अपोलो ११ - चंद्र मोहिमेनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: सुरू झाले, नोव्हेंबरमध्ये ऑपरेशन संपेपर्यंत किमान ३० हजार हुन अधिक लोकांचे निधन.
१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९२३: पहिले महायुद्ध - लुझनचा करार: आधुनिक तुर्कस्तानच्या सीमा निश्चित करणाऱ्यासाठी ग्रीस, बल्गेरिया आणि पहिल्या महायुद्धात लढलेल्या इतर देशांनी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षरी केली.
१९११: हायराम बिंगहॅम - ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१८४७: रिचर्ड मार्च हो - यांनी रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे पेटंट घेतले.
१८२३: चिली - देशात गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
१५६७: स्कॉटलंड - राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024