ए. आर. रहमान

ए. आर. रहमान

६ जानेवारी १९६७

अल्लाहरखा रहमान उर्फ ए. आर. रहमान हे भारतीय संगीतकार, गायक-गीतकार, संगीत निर्माते, संगीतकार, वादक आणि गीत-लेखक आहेत. टाईम या जगप्रसिद्ध मासिकानुसार रेहमान हे जगातील सर्वात प्रख्यात आणि विपुल चित्रपटाचे संगीतकार म्हटले जाते. त्यांची संगीत शैली पूर्वीचे शास्त्रीय संगीत आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक संगीत या दोघांचे मिश्रण करून तयार झालेली आहे. त्यांना दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पंधरा फिल्मफेअर पुरस्कार आणि तेरा फिल्मफेअर अवॉर्ड्स दक्षिण तर या खेरीज इतर अनेक पुरस्कार व नामांकने जिंकली आहेत. त्यामुळेच त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मभूषण’ सुद्धा देण्यात आला आहे.